Ladka Bhau Yojana 2024
मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने स्त्रियांसाठी एक चांगली योजना सुरू केली आहे ती म्हणजे “लाडकी बहिणी योजना “आणि पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे उपस्थित होते. लोकांशी संवाद करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Lakda Bhau Yojana 2024 जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण पिढीमध्ये आनंदाची लहर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की जे तरुण बारावी पास, आयटीआय किंवा डिप्लोमा होल्डर यापैकी कोणीही बेरोजगार असेल तर त्यांना सरसकट त्यांच्या खात्यात रोख रक्कम ६००० ते रुपये १०,००० इतकी मिळणार आहे.
Ladka Bhau Yojana सविस्तर माहिती
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर करत्यावेळी ‘ Ladka Bhau Yojana’ सुरू करावी अशी मागणी केली होती. याला आपण ‘Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana’ असेही म्हणू शकतो. या योजनाद्वारे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण कौशल्य वाढवण्यासाठी मदत होणार आहे. राज्यातील युवक तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर त्यांना नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री ‘Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana’ 2024-25 या वर्षापासून मान्य केली आहे. या योजनेअंतर्गत बारावी पास तरुणांना 6 हजार आयटीआय तरुणांना 8 हजार आणि पदवीधर तरुणांना रक्कम 10 हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की दहा हजार रुपये पर्यंत तरुण बेरोजगारांना महिन्याला अप्रेंटीशीप देणार तसेच 8 हजार हे डिप्लोमा होल्डर ला देणार तरुणांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी लाडका भाऊ योजना ही राज्य सरकारने आणली आहे.
ही योजना देखील वाचा : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेच्या द्वारे महाराष्ट्र सरकार तरुणांना कौशल्य आणि व्यवहारातील कार्याचे प्रशिक्षण देणार आहे. याचा तरुण पिढींना खूप फायदा होणार आहे.तरुण पिढींना आपले कौशल्य वाढविण्यास चांगली मदत होणार आहे.लाडका भाऊ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगारी ही समस्या दूर करणे हा महाराष्ट्र सरकारचा मुख्य हेतू आहे.आणि याचे प्रशिक्षण आपणास म्हणजेच तरुण पिढींना हे विनामूल्य म्हणजेच मोफत मिळणार आहे.
लाडका भाऊ योजना म्हणजेच Mukyamantri Yuva Karya Prashikshan Yojana यात कोणालाही सरसकट फुकट पैसे मिळणार नाहीत, यासाठी महाराष्ट्र सरकारने इंटरशिप योजना आखली आहे. या इंटरशिप योजनेमध्ये तरुणांना एखाद्या कंपनीमध्ये जाऊन 6 महिने इंटरशिप करावी लागेल आणि त्यानंतरच शासनाने जाहीर केलेले पैसे मिळतील. या योजनेमुळे तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता वाढली आहे. ज्या तरुणांना रोजगाराची गरज आहे त्यांनी महाराष्ट्र सरकारने दिलेली अधिकृत वेबसाईटवर rojgar.mahaswayam.gov.in यावर रजिस्ट्रेशन करायचे आहे .त्यानंतर तरुणांनी कंपनीमध्ये जाऊन 6 महिने काम करायचे आहे त्या मोबदल्यात त्यांना हे पैसे मिळणार आहे .परंतु तरुणांना रोजगार करण्यासाठी मुंबई किंवा पुणे अशा मोठ्या शहरात जावे लागणार आहे .
Mukhyamantri Ladka Bhau Yojana Eligibility Criteria
‘ Ladka bhau yojna ’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेली लाडका भाऊ योजना शैक्षणिक पात्रता (Mukhyamantri Ladka Bhau Yojana Eligibility Criteria)असणे अत्यंत गरजेचे आहे.
- उमेदवाराचे आधार कार्ड हे स्वतःच्या मोबाईल नंबर ची लिंक करणे गरजेचे आहे. उमेदवाराचे बँक खाते हे स्वतःच्या आधार कार्डला लिंक असावे तसेच बरोबरीचा रहिवासी पत्ता असणे गरजेचे आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- बारावी पास, पदवीधर, डिप्लोमा होल्डर उत्तीर्ण बेरोजगार तरुणच या योजनेसाठी पात्र असू शकतात. या योजनेद्वारे प्रत्येक शैक्षणिक पात्रधारकांना ठराविक रक्कम दिली जाणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यात अत्यंत गरजेचे आहे
Ladka bhau yojana documents
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना यासाठी आवश्यक कागदपत्रे हे पुढील प्रमाणे आहेत
- उमेदवाराचे आधार कार्ड
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- उमेदवाराची बँक खाते
- वयाचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
लाडका भाऊ योजनेच्या महत्त्वाच्या links:
लाडका भाऊ योजनेचा जीआर डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा | Click Here |
लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरण्याची official वेबसाईट | Click Here |
Ladka Bhau Yojana apply online
अर्ज भरण्याची प्रक्रिया ही माझा लाडका भाऊ योजना नोंदणी 2024 या दिलेल्या मुद्द्यात दिली आहे. ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवर आहे खाली दिलेल्या माहितीत योजनेचा संपूर्ण तपशील म्हणजेच (how to apply ladka bhau yojana)आहे.
या योजनेचा अर्ज Mazaladkabhauyojana.gov.in या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवर भरायचा आहे.
- हा फॉर्म भरतेवेळी पहिल्या पेज मध्ये म्हणजेच होमपेज मध्ये नवीन वापर करता नोंदणी हा पर्याय निवडायचा आहे.
- वापर करता नोंदणी पर्याय निवडल्यानंतर आपणास नवीन फॉर्म स्क्रीनवर दिसेल तो म्हणजे नोंदणी फॉर्म.
- फॉर्ममध्ये दिलेली माहिती योग्य भरायचे आहे.
- फॉर्ममध्ये स्वतःचे नाव फोटो ,पत्ता ,वय आणि इतर तपशील भरायचे आहेत.
- हा फॉर्म भरतेवेळी आवश्यक कागदपत्रे ही अपलोड करणे गरजेचे आहे.
- यात वयाचे प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र हे आहेत.
- हे सर्व भरल्यानंतर खाली स्क्रोल करून submit बटणावर क्लिक करा.
- त्यानंतरच तुमची नोंदणी अर्ज या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
या लाडका भाऊ योजना याची महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली अधिकृत जाहिरात ही खाली दिली आहे. दिलेली सर्व माहिती ही नीट वाचा आणि नंतरच अर्ज करा.
🔔 तर अशाच नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी आमच्या latestjobsadda.com या संकेतस्थळाला भेट द्या तसेच ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या योजनेचा लाभ ते घेतील.
लाडका भाऊ योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना किती रुपये मिळणार आहे?
लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना प्रत्येकी 6 हजार रुपये, आयटीआय यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर डिप्लोमा होल्डर तरुणांना रुपये 10 हजार इतकी मिळणार आहे .
लाडका भाऊ योजनेचा अर्ज करण्यासाठी वयाची अट किती आहे?
लाडका भाऊ योजनेचा अर्ज करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही परंतु तरुण हा बारावी उत्तीर्ण असावा.
लाडका भाऊ योजनेचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
बारावी पास, आयटीआय आणि डिप्लोमा होल्डर उत्तीर्ण बेरोजगार तरुणच या योजनेसाठी पात्र असू शकतात.