Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये महिलांसाठी महत्त्वाची योजना घोषित केली आहे. ती म्हणजे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडून प्रत्येक महिलेला दर महिना रुपये 1500 बँक खात्यात दिले जातील. तर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असणे खूप गरजेचे आहे तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांनी निश्चित केलेले निकष आणि पात्रता असल्याची खात्री आवश्यक करणे गरजेचे आहे.
“माझी लाडकी बहीण योजना” ही महाराष्ट्र सरकारने चालवलेल्या उपक्रमात एक चांगली गोष्ट आहे. ज्यामुळे गोरगरीब मुलींची शिक्षणाची आर्थिक अडचण दूर होईल .आर्थिक विकसित नसलेल्या कुटुंबाला याचा पुरेपूर फायदा होईल ,जेणेकरून मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक साह्य म्हणून ही रक्कम दिली जाईल.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” याद्वारे महिलांना मिळणारे पंधराशे रुपये बँक मध्ये महाडीबीटी द्वारे देण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय हे 21 ते 65 वर्ष असावे .”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेने ऑनलाईन अर्ज केला पाहिजे. ग्रामीण भागातील महिला या स्वावलंबी आणि सक्षम व्हाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार यांनी ही योजना जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता(Majhi ladki bahin yojana eligibility criteria)
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता “जाणून घेण्यासाठी शासनाने काही अटी जाहीर केल्या आहेत ते जाणून घेणे आवश्यक आहे. यामुळे कोणत्या महिला पात्र आहेत या अटीन द्वारे समजवण्यात आले आहे.
योजनेच्या अटी :
- महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- विवाहित ,विधवा तसेच अविवाहित महिलांना प्राधान्य दिलेले आहे.
- महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे स्वतःच्या नावाचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य हा आयकर दाता नसावा.
- कुटुंबाची एकत्रित शेतजमीन ही ५ एकर पेक्षा जास्त नसावी.
- लाभ घेणाऱ्या महिलेच्या नावाने कोणतेही कोणतीही चार चाकी वाहन नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेले सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे .
- लाभ घेणाऱ्या महिलेचे आधार कार्ड.
- शिधापत्रिका / रेशन कार्ड.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- बँक खाते :योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे चालू असलेले बँक खाते आवश्यक आहे .तसेच ते बँक खाते आपल्या मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला किंवा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.
माझी लाडकी बहीण योजना online apply
महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये‘ काही बदल करण्यात आलेले आहे .या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. विधानसभेत निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाची माहिती दिली.
या योजनेचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे .
या योजनेचे अर्ज पोर्टल/ मोबाईल ॲप द्वारे भरले जाऊ शकतात .
अर्ज भरण्यासाठी कोणतीही मूल्य आकारले जाणार नाही.
नारीशक्ती दूत ॲप वर (nari shakti doot app)अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. या ॲपद्वारे आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज( माझी लाडकी बहीण योजना online apply)करू शकतो.
ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात /बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी/ ग्रामीण/ आदिवासी)/ ग्रामपंचायत /वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल.
वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात /बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी /ग्रामीण /आदिवासी) येथे सुविधा केंद्र येथे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल व प्रत्येक अर्णासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी महिला हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक 181 वर संपर्क साधावा.
Majhi ladki bahin yojna online form useful links:
माझी लाडकी बहिण योजना GR | click here |
नारीशक्ती दूत ॲप Download | click here |
माझी लाडकी बहीण योजना New Update
- सुरुवातीला या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते परंतु अनेक महिलांकडे हे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या ऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ,मतदार ओळखपत्र ,शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्माचा पुरवा यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरणार आहे.
- ५ एकर शेती संदर्भातील अट ही शासनाने पुनर्विचार करून रद्द केली आहे .कारण एकत्रित कुटुंबाकडे पाच एकर जमीन असल्यामुळे अशा महिलांना लाभ मिळणार नव्हता. महाराष्ट्र राज्य शासनाने असा पुनर्विचार करून हा निर्णय(माझी लाडकी बहीण योजना New Update) घेतला आहे.
- तसेच या योजनेमध्ये महिलेच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला आवश्यक होता परंतु हा दाखला मिळवण्यासाठी स्त्रिया ,वृद्ध महिला आणि तरुण मुली यांना सेतू केंद्रावर गर्दी करावी लागत असल्यामुळे शासनाने हा निर्णय देखील मागे घेतला. याचा फायदा अशा महिलांना मिळेल ज्यांचे एकत्रित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा जास्त आहे .पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे त्यामुळे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील लागणार नाही.
🔔 तर अशाच नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी आमच्या latestjobsadda.com या संकेतस्थळाला भेट द्या तसेच ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या योजनेचा लाभ ते घेतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीपासून मिळणार आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जुलै 2024 पासून मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेट काय आहे?
यामध्ये वयोमर्यादा ,अविवाहित महिला, पाच एकर शेती ,महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र तसेच अर्जाची तारीख इत्यादी मुद्द्यांमध्ये बदल करण्यात आले आहे .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे.